पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018
गुरुवर्य ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या 84 व्या व गुरुवर्य ह.भ.प.अनंत इंगळे महाराज यांच्या 83 व्या अभिष्टचिंतनानिमित्त आंबेकर-आजरेकर फडाच्या वतीने पंढरीत गुुरुवार दिनांक 27 डिसेंबर पासून श्री विठ्ठल मंदीर सभामंडपात भागवत कथा,गाथा भजन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते कलशपुजन,ऍड.उमेश मराठे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन,महादेव तांबडे (पोलीस आयुक्त सोलापूर)यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथ पुजन,सह.शि.सा.कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते नामजप सांगता,बापुसो बांगर(पोलीस उपायुक्त सोलापूर)यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथ सांगता तर ह.भ.प.मदन महाराज हरिदास यांच्या हस्ते ग्रंथ पुजन व बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते टाळ पुजन करण्यात येणार आहे.
या सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने प.पू.पंढरीनाथ महाराज चवरे आंबेकर-आजरेकर वारकरी भुषण पुरस्काराचे रविवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता विठ्ठल मंदीराच्या सभामंडपात मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.जेष्ठ संपादक विद्याधर ताठे यांना पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशांत परिचारक हे भुषविणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.उमेश मराठे,प्रांताधिकारी सचिन ढोले,विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे उपस्थित राहणार आहेत.
या सप्ताह सोहळयात कथाप्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे हे आपल्या रासाळ वाणीत भागवत कथा संागणार असून ह.भ.प.एकनाथ महाराज दिवाणजी,ह.भ.प.पुंडलीक महाराज नागवडे,ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील,ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर,ह.भ.प.हरिदास महाराज बोराटे,ह.भ.प.मनोहर महराज मुंढे,ह.भ.प.महादेव महाराज राऊत यांचे किर्तन होणार आहेत.तर आंबेकर-आजरेकर फडाचे ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचे काल्याचे किर्तन होऊन 3 जानेवारी 2019 रोजी या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.या सप्ताह सोहळ्यास पंढरपूरातील सर्व वारकरी फडकरी दिंडीवाले महाराज मंडळी तसेच आंबेकर-आजरेकर फडाचे सर्वगावातील शिष्यगण उपस्थित राहणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com




