👁 9 Views

भारत स्वतंत्र झाला तो लोकशाही व्यवस्था स्वीकारून – सोमनाथ गायकवाड

Pandharpur Live 28 December 2018

पंढरपूर: “ आपला देश शाहू, फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा मानणारा आहे, देशाचा कारभार राज्य घटनेतील  स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या पंच सूत्री नुसार चालतो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व जातीधर्मातील लोकांनी बलिदान दिले. भारत स्वतंत्र झाला तो लोकशाही व्यवस्था स्वीकारून.” असे उद्गार अभिनव आकादमीचे संचालक श्री. सोमनाथ गायकवाड यांनी काढले.  
              पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करताना ‘अल्पसंख्यांकांचे हक्क आणि आपण’ या विषायावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे होते. श्री. गायकवाड पुढे म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वधर्म समभावाचे तत्व जोपासले परंतु कालांतराने संख्यावाद निर्माण झाला. त्यामुळे प्रबळ घटकांकडून दुबळ्या घटकांना त्रास होऊ नये, त्यांना संरक्षण मिळावे म्हणून अल्पसंख्यांक आयोगाची गरज निर्माण झाली. दुर्बल घटकाला सामाजिक प्रवाह मध्ये आणण्यासाठी आयोगाची आवश्यकता होती.   
अध्यक्षीय  मनोगत व्यक्त करताना  प्राचार्य भोईटे म्हणाले “ रयत शिक्षण संस्था समतेचे तत्व जोपासत आहे, विद्यार्थ्यानी शैक्षणिक प्रगतीला स्वकर्तृत्व, प्रयत्न आणि आत्मविश्वास याची जोड देऊन स्वतःचा विकास करून सन्मानाने जीवन जगावे. ”  यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. अभिमन्यू माळी आदी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.अभिमन्यू माळी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. आर. एस. पवार यांनी केले. आभार प्रा. सी. एच. गिड्डे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक  विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *