👁 8 Views

कायदा हा राज्य घटनेचा आरसा आहे -वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019


स्वेरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८ वी जयंती साजरी.
 पंढरपूर-‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असून आजच्या विद्यार्थीनींना  कायद्याची ओळख देखील  असणे  अत्यंत गरजेचे आहे. कायदा हा राज्यघटनेचा आरसा आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटना सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक धनंजय  जाधव  यांनी केले.             
        

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पो.नि. जाधव विद्यार्थीनींना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे  होते.  सुरवातीला दीप्ती घोडके, सोनाली जगताप, स्नेहल पिसे आणि ज्ञानेश्वरी काळोखे यांनी ‘शिक्षण हे समाजाला जागे करण्याचे साधन असूनस्त्रियांना त्याची जास्त आवश्यकता आहे. हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. असे अनेक महत्वपूर्ण विचार मांडले. पुढे बोलताना पो.नि.जाधव म्हणाले की, कायदा हा मुलींच्या, महिलांच्या बाजूने आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी पुरुषांच्या जाचक चाली रितीला न घाबरता थेट पोलीस ठाणे गाठून त्यावर तक्रार दाखल करता येते. आता अकस्मात घडलेल्या प्रसंगी तात्काळ याची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला व्हावी या हेतूने शासनाने १०९१ असा टोल फ्री क्रमांक नव्याने सुरु केला असून माहिती मिळताच अल्पावधीत महिला पोलीस मदतीस धावून येतात. याचबरोबर ‘प्रतिसाद’ नावाने अॅप बनविण्यात आला आहे. याचा अभ्यास करून अडचणीच्या वेळी वापर करावा.’असे सांगून  ३०४-ब, ३५४, ३६३, ४९८-अ अशा महिलांना आवश्यक असणाऱ्या अशा अनेक कायदा कलमांची माहिती पो.नि. जाधव यांनी करून दिली. 

वसतिगृह व्यवस्थापक व कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांनी वसतिगृहाची वाटचाल व विद्यार्थीनींसाठी आखून दिलेले नियम याची माहिती करून दिली. यावेळी अनेक वैष्णवी मोरे, कोमल कोकरे, यांच्यासह विद्यार्थीनींनी प्रश्न विचारले यावर पो. नि. जाधव यांनी सविस्तर माहिती दिली अध्यक्षीय भाषणातून संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘अपेक्षा या कोणाकडूनही  न ठेवता स्वतःपासून ठेवा.’ असे सांगून वसतिगृहात राहून अभ्यास कसा केला आणि आलेल्या अडचणीवर कशी मात केली.’ याचे अनुभव कथन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या खडतर जीवन कार्यावर प्रकाश टाकले. यावेळी बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहातील ११०० विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर व अरुणा पुजारी यांनी केले तर फार्मसीचे उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी आभार मानले.
छायाचित्र- स्वेरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर तालुका पोलोस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक धनंजय जाधव  सोबत वसतिगृहाचे व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, प्रा. करण पाटील, प्रा. सतिश मांडवे, डॉ. एस.डी. सोनवणे, डॉ. आर.आर. गिड्डे आदी.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *