👁 8 Views

जुनी पेंशन हक्क संघटन पेंशन महामेळावा व सावित्रीची छाया पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2019

पंढरपूर – दिनांक 06 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटनेचा जिल्हा स्तरीय मेळावा व “सावित्रीची छाया- कर्तत्त्ववान महिला” पुरस्कार वितरण सोहळा स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज गोपळपूर,
पंढरपूर येथे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. श्री. दत्तात्रय सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके,सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर तसेच श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे
व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व पोलिस उपनिरिक्षक ज्योती चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 आमदार  भारतनाना भालके साहेब यांनी जुनी पेंशन ही कर्मचार्यांची न्याय हक्काची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले, तसेच हा मुद्दा कॉंग्रेस पक्षाच्या
जाहिरनाम्यात घेण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  सुशिलकुमार शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.  आमदार  दत्तात्रय सावंत यांनी आत्तापर्यंत जुनी पेंशनचा मुद्दा वारंवार सभागृहात मांडला असल्याचे सांगत यापुढेही जुनी पेंशनच्या मागणीचा आवाज बुलंद करणार असल्याचे सांगितले. तसेच कर्मचार्यांवर अन्याय करणारा 23/10 चा शासन निर्णय रद्द करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन असे भरीव
आश्वासन दिले.

या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील कर्मचार्यांनी पुकारलेल्या “ नो पेंशन… नो वोट” या ऐतिहासिक चळवळीच्या पोस्टरचे अनावरण मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पोस्टरमध्ये जो पक्ष आम्हाला जुनी पेंशन मिळवून देईल, त्याच पक्षाला आम्ही मदतान करू असा आशय समाविष्ट आहे. या कार्यक्रमामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, पोलिस खाते, आरोग्य विभाग आदी विभागातील उल्लेखनीय कार्य करणार्या सावित्रींच्या लेकींचा “ सावित्रीची छाया” या पुरस्काराने गौरव 
करण्यात आला. तसेच माळशिरसचे तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल शिंदे यांना संघटनेच्या वतीने युवा सारथी या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे यांनी संघटनात्म लढा स्पष्ट करत जुनी पेंशनच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी जास्तीचे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. तसेच
जिल्हाध्यक्ष नवनाथ धांडोरे व भारत पाटील यांनी जुन्या पेंशनसाठीचा लढा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. मान्यवरांचे स्वागत पंढरपूर तालुकाध्यक्ष मा. श्री. संदिप खेडकर यानी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व मुलुख मैदानी तोफ मा.श्री.
रियाज मुलाणी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सोमनाथ अनासरे,श्री. दिगंबर तोडकरी, श्री.रामराव शिंदे, श्री. किरण काळे, श्री. साईनाथ देवकर, श्री. बिभिषण खंदारे, श्री. अविनाश बांगर, श्री. वसूदेव बडे, श्री. सिद्धेश्वर लेंगरे, सौ.
राणी होनमाने, श्री. दत्तात्रय मुळे, श्री. विकास कांबळे, श्री. कैलास सोनवणे, श्री. पंडित देवकर, श्री. नामदेव वनवे, सौ. स्वाती चोपडे, श्री. राजेंद्र सुर्यवंशी, श्री. दिपक वडवेराव, श्री. अभिजित चवरे,श्री. महेश कसबे, श्री. महेश जगताप, श्री. राजेंद्र कांबळे, श्री. संजय पवार, श्री. अरूण चौगुले, श्री. रिजवान शेख, श्री. आशिष चव्हाण, श्री. प्रशांत लंबे , श्री. बाळासाहेब चव्हाण, श्री. साईनाथ नाईनवाड आदिंनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *