पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2019
कोर्टी सिंहगड पब्लिक स्कूलच्या वार्षिक संमेलनाचे उद्घाटन करताना पोलिस उपधिक्षक सागर कवडे, डॉ. कैलाश करांडे, कर्नल धपोला, प्रा. सोमनाथ नवले, प्रा. दादासाहेब नवले, प्राचार्या डॉ. उषा धपोला, मुख्याध्यापिका स्मिता नवले. आदी.
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पंढरपूरचे पोलिस उपधिक्षक सागर कवडे, पंढरपूर सिंहगड कँम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, कर्नल नंदन धपोला, प्रा. सोमनाथ नवले, प्रा. दादासाहेब नवले, प्राचार्या डॉ. उषा धपोला, मुख्याध्यापिका स्मिता नवले आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले.
बुधवार संध्याकाळी बाल कलाकारांनी तबला, गायन, हार्मोनियम, ड्रमसेट, ट्रिफल, चमेली, पखवाज,ढोलकी, ढोलक, गिटार, सितार, कॅसिओ, टाळ, खंजेरी अशा भारतीय व पाश्चात्य वाद्यांची अतिशय लयबद्ध,तालबद्ध व स्वरबद्ध अशी अनोखी जुगलबंधी सादर केली. यावेळी पालकांनी अक्षरश: ताल धरून एक आनंद व्यक्त करताना बाल कलाकरांचे कौतुक केले.
सिंहगड पब्लिक स्कूलचा ९ वा वार्षिक स्नेहसमेलन मध्ये दरवर्षी सिंहगड शाळेच्या स्नेहसंमेलनाचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे दर वेळेस येथे नव नवीन विषयावर स्नेहसंमेलन साजरे केले जाते. यावेळी देव, निसर्ग, गुरु,परिवार, समाज इ. विषयांवर विद्यार्थ्यांनी विषयाशी अनुसरून अतिशय सुंदर विशिष्ठ पोषाखात तालबद्ध व लयीबद्ध नृत्ये सादर केली. प्रारंभी पोलीस उपाधिक्षक सागर कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वीर बाजिराव देशपांडे व छत्रपती शिवाजी महाराज यांची एक गोष्ट सांगत म्हणाले, तुम्ही जेवढे ध्येय मोठे ठेवता त्याहुन मोठा तुमचा प्रयत्न, निष्ठा, चिकाटी व धडपड महत्वाची असते. विद्यार्थ्यांच्या या कलासादरीकरणाने सर्वच पालक आनंदी झाले. हा कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







