👁 9 Views

मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी रंगूनवाला डेंटल कॉलेजची जनजागृती मोहिम ,मशाल पदयात्रा

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2019

हेल्मेट धारक दुचाकी चालकांना दिली गुलाबपुष्पे !
पुणे :पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेज तर्फे आयोजित मुख कर्करोग   जनजागृती मोहिम आणि हेल्मेट वापराविषयी मशाल पदयात्रा आज सकाळी आझम कॅम्पस ,सेव्हन लव्हज चौक,स्वारगेट  मार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पर्यंत काढण्यात आली . 

या पदयात्रे मध्ये  विद्यार्थ्यांनी हेल्मेट धारक दुचाकी चालकांना गुलाबपुष्पे  दिली  तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना अपघाताच्या शस्त्रक्रियांचे फोटो दाखवले ! ‘ये पान हमे इस मोड पे ले आया ‘ हे मुख कर्करोगावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले . 
हेल्मेट  न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातात दात तुटणे ,जबडा फाटणे ,हनुवटी तुटणे याचे प्रमाण अधिक आहे . त्यात दंत चिकित्सकांना  (मॅक्सीलोफेशियल सर्जन्स ) शस्त्रक्रिया कराव्या लागतात . त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे पोस्टर घेऊन ,१०० डेंटिस्ट ,डेंटल विद्यार्थी ,या मशाल मिरवणुकीत सहभागी झाले  . 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *