👁 9 Views

विकतचं दुखणं ! आईच्या वयाच्या महिलेला तरुणाने केलं प्रपोज , भडकलेल्या काकूंनी चारचौघात जे उत्तर दिलं …

 

प्रेमाला कुठे वयाचं बंधन कळतंय असं म्हणतात पण जर ते दोन्ही बाजूने सहमतीने असेल तरच.. नाहीतर मग या पठ्ठ्यासारखी चारचौघात मान खाली घालावी लागते 


सोशल मीडियावर सध्या भररस्त्यातील एक हाय व्हॉलटेज ड्रामा पाहायला मिळत आहे. यात एका प्रेमवीराने चक्क आपल्या आईच्या वयाचा काकूंना प्रपोज केल्याचे समजत आहे. काकू या मुलाचा फाजील आत्मविश्वास पाहून इतक्या भडकल्या होत्या की त्यांनी रस्त्यातच त्याची चांगली शाळा घेतली. आता आपला प्लॅन फसल्याचे कळल्यावर उरली सुरली इज्जत घेऊन पळ काढण्यासाठी हा तरुण काकूंची क्षमा मागतो पण तेव्हा त्याचं बोलणं ऐकून काकू व आजूबाजूची मंडळी एवढी भडकतात की तिथेच त्याच्या कानशिलात लगावली जाते. नेमका हा व्हिडीओ आहे तरी काय चला पाहुयात..


तर झालं असं की, व्हिडिओच्या सुरवातीलाच एक महिला तरुणावर चढ्या आवाजात आरोप लावताना पाहायला मिळत आहे. ती म्हणते, “याच्या वयाची तर माझी मुलं आहेत, निर्लाज्जासारखा अश्लील गोष्टी करतोय” असं म्हणून काकू त्याला बडबडू लागतात. यावर तो तरुण ओके ठीक आहे मला माफ करा, काकू असं म्हणतो. मग काकू ज्या काही भडकून उठतात, आता मला प्रपोज करत होता आणि आता फसल्यावर लगेच मी काकू झाले का असं म्हणत त्या पुन्हा आपल्या शब्दांचा मारा त्या तरुणावर करू लागतात. हा सगळा प्रकार पाहता बाजूला असणारे एक वयस्कर काका सुद्धा पेटून उठतात आणि सरळ त्या तरुणाच्या कानाखाली लगावतात.


दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी तरुणाच्या फजितीवर भाष्य केले आहे. म्हणून जरा वय बघून आशिकी करावी. व्हॅलेंटाईन आधी कोणी मिळेना वाटतं अशा कमेंट या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. काहींनी तर त्या मुलाची बाजू घेत जाऊदे ना नाही म्हणून बाजू व्हायचं असा सल्ला काकूंनाही दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *