👁 6 Views

पंढरपूर सिंहगडच्या माजी विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट

पंढरपूर: प्रतिनिधी

२०१७ मध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले इंजिनिअर अजित सुकाळे, सागर शिंदे व वैभव खंडागळे यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली असल्यची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.


गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अजित सुकाळे, सागर शिंदे व वैभव खंडागळे यांनी भेट दिली असून हे तिघेही सध्या तरीनी स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत आहेत.


   अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून ही सिंहगड महाविद्यालयाशी असलेली नाळ ही अतूट असल्याचे या भेटीदरम्यान मधुन दिसून आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांशी चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.


   यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील शिक्षकांबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नामंकित मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी देण्यासाठी कटिबद्ध असुन भविष्यात कंपनीला आवश्यक असणारे परफेक्ट इंजिनिअर यासंदर्भात चर्चा झाली. 


   शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी महाविद्यालयात येऊन शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करत असल्याने महाविद्यालयातील शिक्षणाबद्दल पालकांमधुन कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *