👁 10 Views

महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अधिवेशन पंढरपुरात

पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाचे ३८ वे राज्यस्तरीय
अधिवेशन दि.९ व १० फेब्रुवारी रोजी पंढरपूरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात
आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख ,
महासचिव डॉ.सुधाकर जाधवर व स्वागताध्यक्ष डॉ. अशोक भोईटे यांनी दिली.
सदर अधिवेशनाचे उद्‌घाटन ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे
सार्वजनिक आरोग्य,परिवहन,कामगार ,राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री मा.ना. विजयकुमार देशमुख यांचे शुभहस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या भूषविणार आहेत
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, रयत शिक्षण
संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित
राहणार आहेत.                       
या उद्‌घाटन समारंभानंतर मुंबई येथील रुसा (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) चे
सहसचिव डॉ. विजय जोशी, औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे व पुणे
विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत (महाराष्ट्रातील उच्चशिक्षण सद्यस्थिती), बेंगळूरू येथील
नॅकचे उपसल्लागार डॉ. गणेश हेगडे (नॅक मूल्यमापन – नवीन प्रणाली) हे मार्गदर्शन करणार आहेत.
या शिवाय भारतीय उच्च शिक्षणाचा भविष्यवेध , उच्च शिक्षणाची गुणवत्ता, स्वायत्त
महाविद्यालय, कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम, उच्च शिक्षणातील बदल, उच्च
शिक्षणातील आव्हाने, इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर इ. विषयावर संशोधन पत्रिका
सादरीकरण होणार आहेत. 

खुल्या अधिवेशनात उच्च शिक्षणातील समस्या , आव्हाने, दर्जा या
विषयांवर सविस्तर व समग्र चर्चा करून त्या अनुषंगाने ठराव करून शासनाकडे पुढील
कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दि. ९ रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० यावेळेत
उपस्थितांना महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या
अधिवेशनाला राज्यभरातील अशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बहुसंख्येने उपस्थित राहणार
आहेत.

अधिवेशनाचा समारोप दि. १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ठीक ८.०० वाजता महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघ कार्यकारिणीची बैठक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित केल्याची माहितीही यावेळी प्राचार्य डॉ. देशमुख यांनी दिली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *