👁 11 Views

सामाजिक गरजेनुसार अभ्यासक्रमाची आवश्यकता- डॉ. व्ही. बी. घुटे

पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2019

 इंग्रजी, मराठी,अर्थशास्त्र व प्राणीशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा संपन्न  




पंढरपूर: ‘ समाजाची गरज ओळखून अभ्यासक्रम निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सक्षम अभ्यासक्रम तयार करावेत. पदवी शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित कोर्सेस सुरु करावेत. जागतिकीकरण व खाजगीकरणामुळे उच्चशिक्षणापुढे आव्हाने निर्माण झाली आहेत.
याचा सामना करण्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालये सक्षम असली पाहिजे.  आपल्या विद्यापीठाकडे गुणवत्ता असेल तर विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाणार नाही. समाज आणि विद्यापीठ यांच्यातील दरी अभ्यासक्रमाने कमी करणे आवश्यक आहे. विद्यापीठातील संशोधने समाज उपयोगी असायला हवीत.’ असे विचार सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र आणि प्राणीशास्त्र कार्यशाळांच्या उदघाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, ‘तात्विक ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञानही आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यासक्रम हे कौशल्य आधारित असावेत. त्यातून विद्यार्थी स्वयंपूर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे ’ यावेळी व्यासपीठावर इंग्रजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा सौ. डॉ. अॅनी जॉन, उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, विभाग प्रनुख डॉ. सौ. सुनिता भोईटे, प्रा. किशोर शिंदे, प्रा. चंद्रकांत रासकर, डॉ. राजाराम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. अमर कांबळे यांनी करून दिला. सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. के. पी. गायकवाड आणि प्रा. कु. सारिका भांगे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ. रमेश शिंदे मानले. कार्यक्रमाची सांगता
राष्ट्रगीताने झाली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *