👁 9 Views

परभणीत एक पुस्तक एक दिवस अंतर्गत “बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” पुस्तकावर चर्चा

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


परभणी :- 
 गणेश वाचनालयात एक पुस्तक एक दिवस अंतर्गत श्री.प्रसाद कुमठेकर लिखित “बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” या पुस्तकावर चर्चा संपन्न झाली, या चर्चेत सोलापूर येथील श्री.दत्ता घोलप व स्वत: लेखक प्रसाद कुमठेकर सहभागी झाले होते. सुरवातीला
कै .नरहर कुरुंदकरांच्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या प्रतिमेच पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल, तदनंतर अनंतराव उमरीकर व केशव खंटिग यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ वर आपले विचार मांडताना दता घोलप म्हणाले की कांदबरी वाचणे एक ह्र्द उपक्रम असतो पण कांदबरीवर बोलण निरस तर एकन तर खूपच कंटाळवान असत,कांदबरी हा प्रकार साधारण दीडशे वर्षा पूर्वी मराठीत आला, कांदबरी हा प्रकार सतत विकसित होत गेला, तर कांदबरी प्रकारान महाराष्ट्राच दस्तऐवजीकरण करण्याच काम केल आहे, कांदबरीकार सतत पुढच बघत असतो तो उद्याच जग दाखवत असतो, कांदबरीकार हा आजच्या वास्तव जगातुन भविष्याची वाटचाल सूचित करत असतो. मराठी कांदबरी ही आजही विवेकाचा आवाज बोलते. . 

सध्याच्या काळात सांगण्या सारख खूप आहे पण गोष्ट सांगता येत नाहीये, सध्याचा काळ हा गोष्ट हरवण्याचा काळ आहे. मी तरीही आशादायी आहे की कुमठेकर हे या हरवत चाललेल्या गोष्टीची गोष्टी सांगत आहेत, साध्या सोप्या कमी आवकाश व्यापणाऱ्या,पण समाजाला महत्वाचा संदेश देणाऱ्या गोष्टी कुमठेकरांनी ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या ’ च्या माध्यमातून समाजा समोर ठेवल्या आहेत

 कुमठेकर यांनी लिहिताना त्यांना जस दिसल, जस वाटल तस स्पष्टपणे लिहील त्यांनी कोणाचीही सोय पाहत नाहीत, अनुभव व अनुभवांची भाषा दोन्ही एकच असल्यामुळे, वाचताना ती पात्र आपल्या भोवतालची वाटतात. मराठी कादंबरी विषयी बोलताना वेगवेगळे संदर्भ प्रभावीपणे श्री घोलप यांनी मांडले
यावेळी श्री.प्रसाद कुमठेकर याची श्री.महेश देशमुख यांनी घेतली. कार्यक्रमास जाणकार श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय कुलकर्णी यांनी केले.  


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *