👁 6 Views

पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

 

नागपूर: काही दिवसांपूर्वी नागपूर शहरातील बेसा परिसरात पाण्याच्या टाकीत एका पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता.


 बेसा परिसरात कुटुंबासह राहणारी 5 वर्षीय निष्पाप ज्योती साहू ही गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घरासमोर खेळत होती.


त्यादरम्यान अचानक खेळत असताना ती घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही.

 यानंतर हताश होऊन कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात ती मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर दुसऱ्या दिवशी घराजवळील मोकळ्या जागेत बांधलेल्या टाकीत ज्योतीचा मृतदेह आढळून आला. 


बेलतरोडी पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *