👁 10 Views

वडिलांसमोर पोलिस जवाणाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या

 

गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शेत जमिनीच्या वादातून एका पोलीस जवानाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


घटनेत मृताचे वडील गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिरोली/महागाव येथील शेत जमिनीच्या वादावरून एका पोलिस जवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत मृतकाचे वडील गंभीररित्या जखमी झाले आहे. विलास रामदास मस्के, (वय 41 वर्षे) असे मृतक पोलीस जवानाचे नाव आहे.


मृतक हा नवेगावबांध येथे पोलीस दलातील सी 60 मध्ये कार्यरत होता. तर त्यांचे वडील रामदास मस्के, वय 72 वर्षे हे गंभीर रित्या जखमी असून त्यांच्यावर अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.  मृतक हा विलास हा आपल्या वडिलाबरोबर आपल्या शेतात उंनाळी धानाची रोहनी करत असताना आरोपींनी त्या ठिकाणी येत विशाल आणि त्यांच्या वडिलासोबत वाद सुरू केला.


हा वाद प्रचंड विकोपाला गेला. त्यानंतर आरोपींनी विलासला बेदम मारहाण सुरू केली. मृतक विलास याला तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणामध्ये विशालचा जागीच मृत्यू झाला तर बचाकरण्यासाठी आलेल्या त्या वडीला देखील आरोपीने मारहाण केली असल्याने ते सुद्धा गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेतील आरोपी अभिषेक सिंह पवार (वय 39 वर्ष), जयकुमार सिंग पवार (वय 72 वर्ष), सुमित सिंह पवार (40), वैष्णव सिंह पवार (वय 36), नरेंद्र पवार (वय 43 ), जितेंद्र सोनाग्रे वय 26 (वर्ष सर्व रा. महागाव) सर्व आरोपींविरुध्द यांच्या विरोधात 302, 326, 504, 506, 143, 147, 148, 149, भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *