👁 13 Views

कर्मवीर आण्णांच्या विचाराचा वसा आणि वारसा रयत सेवकांनी जोपासावा – डॉ. अनिल पाटील

Pandharpur LIVE 27 February 2019

पंढरपूर: दि. “ कर्मवीर आण्णा म्हणायचे ‘उडणाऱ्या पक्षाचे पंख कापायचे नसतात, पक्षी आकाशात भरारी घेऊन परत तो आपल्या घरट्यात येतो.’ रयत शिक्षण संस्थेतला प्रत्येक सेवक रयतेची संस्कृती जपत असतो. प्राचार्य डॉ. बचुटे यांनी रयत संस्कृती काम करताना सांगोला महाविद्यालयात रुजवावी. आज रयत शिक्षण संस्थेच्या तीन महाविद्यालयाला समूह विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. ही रयत सेवकासाठी आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात पारंपरिक शिक्षणाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची व संशोधनाची गरज आहे. ” असे विचार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रमुख प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे यांची सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.



📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे म्हणाले की, ‘निगर्वी, संयमी, ज्ञानलालस, सूक्ष्मनिरीक्षक, मनमिळावू, सकारात्मक भूमिका असणारे सर्वगुणसंपन्न
असे बचुटे आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. स्वतःचे मूल्य आणि तत्व घेऊन जगणारे आणि शब्दाला जागणारे असे आहेत. प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. या वृत्तीमुळेच ते आज प्राचार्य पदावर
कार्यरत आहेत.’ असे विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य. बचुटे म्हणाले की, ‘रयत शिक्षण
संस्थेमुळेच माझे कुटुंब आनंदी आहे. रयत लोकशाही संस्था आहे. संस्थेत काम करण्याची मोकळीक दिली जाते. मी प्रामाणिकपणे काम केले आहे. कर्मवीरांचे नातू डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला हे माझे
भाग्य आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *