Pandharpur LIVE 6 March 2019
पंढरपूर (प्रतिनिधी):- आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेच्या वतीने नागरिकांना, भाविकांना व शालेय विद्यार्थ्यांना कडाक्याच्या ऊन्हाळ्यात थंडगार पिण्याचे शुध्द पाणी मिळावे. या उद्देशाने आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे पाणपोईची सुविधा उपलब्ध केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन आज दि. 6 मार्च 2019 रोजी शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. अशी माहिती आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
गेल्या अनेक वर्षापासून पंढरीत अंध विद्यार्थ्यांची जडणघडण करत त्यांना शिक्षण देणार्या शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंध शाळेत अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. या अंधशाळेत जावुन अनेकजण आपले वाढदिवस वगैरे साजरे करताना आढळतात. या विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षकांना शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर सन्मानाने आमंत्रीत करुन त्यांच्या हस्ते एखादा कार्यक्रम घेऊन किंवा त्यांना सन्मान देण्याची अनेक वर्षापासूनची आमची इच्छा होती. आज पाणपोईच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायमशाळेत बोलावुन त्यांच्या शुभहस्ते पाणपोईचे उद्घाटन केले. याचबरोबर या सर्वांना खाऊ वाटप करुन त्यांचा यथोचित सत्कार केला. वाल्मिकी भवन, सरकारी दवाखान्याच्या समोर, क्रांती चौक, पंढरपूर येथे उपलब्ध केलेल्या या पाणपोईमध्ये 24 तास पिण्याचे शुध्द व थंडगार पाणी उपलब्ध आहे. याचा भाविकांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.
यावेळी गणेश अंकुशराव, सुजाता पाटील (मुख्याध्यापिका, अंधशाळा) शिक्षक नितीन कटप, सुनील वाघमारे, शोभा घाटे व शाळेतील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामभाऊ कोळी, विकी अभंगराव, सुरज कांबळे, अस्लम देवळे, रवि शिंदे, नितीन वाघमारे, श्रीकांत बळवतकर, जोतीबा कोळी, बाळासाहेब अधटराव, रामभाऊ गवळी, राम कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



