👁 11 Views

पुण्यातील सराफावर गोळीबार… सराफा पेढीवर दरोडा

Pandharpur LIVE 6  March 2019

सराफावर गोळीबार करीत चोरट्यांनी सुमारे अडीच-तीन किलो सोने लंपास केल्याची घटना रहाटणीतील कोकणे चौक येथील पुणेकर ज्वेलर्स मध्ये घडली आहे. दिव्यांक प्रदीप मेहता (२४ रा. रहाटणी) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दुकानात तीन जण घुसले. त्यांनी दुकानाचे शटर बंद करून दिव्यांक यांच्या पायावर गोळी मारून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. तर अन्य दोघांनी शेजारी दुकानदाराला बोलण्यात गुंतवले होते. चोरट्यांनी जाताना दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन देखील काढून नेले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी सुरू आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *