Pandharpur LIVE 18 March 2019
पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. मिरामार समुद्र किनारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘मनोहर भाई अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर सहा वाजेच्या सुमारास मिरामार बीचवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हवेत बंदुकीच्या २१ फैरी झाडत लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यापूर्वी पणजीतील भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com