Pandharpur LIVE 18 March 2019
प्रोजेक्ट स्पर्धेत बी.एम. पॉलिटेक्निक सोलापूर तर पोस्टर
प्रेझेन्टेशनमध्ये शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर प्रथम
पंढरपूर– (संतोष हलकुडे) गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘इलेक्ट्रोकॉम २ के १९’ या राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रमाच्या समारोप प्रसंगी विजेत्या स्पर्धकांनी स्वेरीने केलेल्या अदभूत नियोजनावर प्रचंड खुश होऊन जल्लोश साजरा केला आणि ‘इतर महाविद्यालयांनी स्वेरीच्या अशा उपक्रमाचे अनुकरण करावे असे कार्य स्वेरीतून होत आहे.’ अशी कबुली देखील बाहेरून आलेल्या संशोधक स्पर्धकांनी दिली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
स्वेरीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. त्याचेच फलित म्हणून पाहुणे स्पर्धक विजयी मुद्रेने परतली. यावेळी स्वेरीने हृदयात राहील अशी कामगिरी केल्याचे सांगत होते. यावेळी स्पर्धेत पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉम्पिटीशन अशा प्रकारांचा समावेश होता. इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक गिरीधर शेट्टीगार, हरीश मिथा, संकेत तालीकोटी, ऋषिकेश लबडे, द्वितीय क्रमांक-संजीवनी हाडोळे, रेणुका नाईक तर तृतीय क्रमांक-प्रथमेश सुर्वे, दुर्गाप्रसाद दोंतुल, अभिषेक सादूल यांनी पटकाविला तर पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक-आकाश बिराजदार, द्वितीय -संग्राम तळेकर व आनंद घोडके तर तृतीय क्रमांक-प्रियांका तगारे, दिव्या वाघमारे व स्वप्नाली घोगरे यांनी मिळविला तसेच कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक- तेजस पाटील, द्वितीय-कोमल चितारी, तृतीय- अक्षय विडाप तर पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक -साक्षी बनसोडे, द्वितीय-भक्ती जोशी, तर तृतीय क्रमांक- सोनाली लांडगे यांनी पारितोषिके पटकाविली तर ‘विशेष प्रकल्प’ म्हणून आहेर कॉलेज, कराडच्या सिद्धार्थ भोकरे यांच्या प्रकल्पाला गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीसे, प्रमाणपत्र व सन्मान चिन्हे दिली. या स्पर्धेमध्ये विजेत्याना एकूण पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिली. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र दिले. या कार्यक्रमामध्ये अभियांत्रिकीच्या डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात परिश्रम घेतले. यावेळी प्रा. एस. आर. पंखे, चेतन विभूते, सुरज डोके, प्रा. प्रमोद खराडे, संतोष कदम यांनी परिक्षक म्हणून उत्कृष्ठ काम पाहिले. बक्षीस वितरण प्रसंगी ट्रेनिग अँण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. एम.के. राऊळ, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. ए.एस. विभुते, वैभव मछाले, आदित्य कोठारे, स्वेरीचे माजी विद्यार्थी अजिंक्य मछाले, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रा.नीता कुलकर्णी, प्रा. आर.डी. कुलकर्णी, इतर प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह राज्यभरातील अभियांत्रिकीतील जवळपास चारशे संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.एस. ए. शेगदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.एन.डी. कारंडे यांनी आभार मानले.


