👁 9 Views

धरणात बुडून मायलेकासह एका मुलीचा मृत्यु

Pandharpur LIVE 18 March 2019


माजलगाव – माजलगाव धरणावर  कपडे धुण्यासाठी  गेलेल्या एका महिलेसह दोघांचा पाण्यात  बुडून मृत्यू झाला आहे.  मंगळवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. मृतांमध्ये मायलेकासह मृत महिलेच्या बहिणीच्या मुलीचा समावेश आहे. शेख नशो शेख नसीम (वय- 30), सोहेल शेख नसीम (वय- 11 ) शेख तब्बू शेख राजू (वय- 14 ) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.







याबाबतची हकीकत अशी की, माजलगाव धरणापासून जवळच राहत असलेल्या शेख नसीम या धरणावर धुणे धुण्यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचा 11 वर्षाचा मुलगा सोहेल शेख आणि शेख तब्बू ही बहिणीची मुलगी होती. माजलगाव बॅक वॉटर प्रकल्पाच्या कडेला धुणे धूत असताना शेख सोहेल आणि शेख तब्बू पाण्यामध्ये खेळता-खेळता खोल पाण्यात गेले. दोन्ही मुले पाण्यात गेल्याचे पाहून शेख नशो यांनी खोल पाण्याकडे धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख नशोदेखील पाण्यात बुडाल्या. यामध्ये मायलेका सह शेख नशो यांच्या बहिणीच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पाण्वयातून बाहेर काढले असून माजलगाव पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्या आली आहे.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *