Pandharpur LIVE 21 March 2019
पंढरपूर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणजे पंढरपूर सिंहगड असून या महाविद्यालयात तज्ञ व अनुभवी प्राध्यापक आहे. प्राध्यापकांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रधायापकांची विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. चांगल्याप्रकारे ज्ञान मिळत असल्यामुळे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी आज या प्राध्यापकांच्या ज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात आज अग्रेसर ठरत आहेत, असे मत पालक प्रतिनिधी दिगंबर चोरमुले यांनी पालक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागामध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे, पालक प्रतिनिधी प्रा. दिगंबर चोरमुले, इंजि. सुधाकर गाडेकर आदी मान्यवरांच्या सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com



