Pandharpur LIVE 29 March 2019
माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असुन माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे रणजित नाईक- निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे बहुचर्चित माढ्यात राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे विरूद्ध रणजित निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे.
माढ्यातून भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, रोहन देशमुख यांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर रणजित नाईक निंबाळकर यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र, मोठा गाजा-वाजा करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मोहिते-पाटलांना डावलल्याचे चित्र आहे.
शरद पवार मागील महिन्यात माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसात तेथून माघार घेतली. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला. पवारांनी माघार घेतल्यानंतर तेथून खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांनी निवडणूक लढवावी असे राष्ट्रवादीने सुचवले. मात्र, विजयदादांनी मुलगा रणजितसिंह यांना उमेदवारी द्यावी सुचवले. मात्र, पक्षातील नेत्यांचा रणजितसिंह यांच्या नावाला विरोध असल्याचे सांगत त्यांना तिकीट देण्यात राष्ट्रवादीने नकार दिला. त्यामुळे नाराज होऊन मोहिते पाटील घराण्याने भाजपची वाट धरली. मात्र, त्यानंतर भाजपच्या गळाला फलटणचे रणजित नाईक-निंबाळकर लागले.
भाजपने त्यांना पक्षात घेताना उमेदवारीचा शब्द दिला. मात्र, त्यानंतर निंबाळकर यांना अंतर्गत सर्व्हेत फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले गेले. त्यानंतर मागील तीन-चार दिवस माढ्यातील उमेदवारीबाबत भाजपात खल सुरू होता. मात्र, कोणतेही नाव अंतिम होत नव्हते. मोहिते-पाटील विरूद्ध संजयमामा शिंदे अशी लढत व्हावी अशी बहुतेकांची इच्छा होती. मात्र, मोहिते-पाटलांनी एक पाऊल मागे घेत रणजित नाईक-निंबाळकरांना रान मोकळे करून दिले.
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…