Pandharpur LIVE 29 March 2019
लोकसभेच्या रणधुमाळीत माजी क्रिकेटपटू राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. सचिनने एकाच महिन्यात तिस-यांदा पवारांची भेट घेतली. पवार आणि सचिन यांच्या भेटीमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
लोकसभेच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर आता सचिननेही पवारांची भेट घेतल्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. ही भेट खासगी कारणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे राजकीय गणित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सचिनने पवारांच्या वरळीतील सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट घेतली. यानंतर तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका तपशील अजूनही समजू शकलेला नाही. पवारांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सचिननेही प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.
पवारांचा राजकीय चमत्कार करण्याचा एकूण लौकिक पाहता या भेटीमुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस महाआघाडीने ही निवडणूक महत्वाची केली असून मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे विशेष लक्ष आहे. त्या दृष्टीकोनातून तर ही भेट नाही ना, अशीही चर्चा सुरु आहे.