पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील भक्त पुंडलिक मंदिर व महादेव मंदिर देवस्थानचे जेष्ठ पूजारी, देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त प्रकाश दाजीराम संगीतराव (वय 70) यांचे शनिवार दि. 30 मार्च 2019 रोजी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले.
प्रकाश संगीतराव हे कोळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते होते तसेच श्री पुंडलिक व महादेव मंदिराचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होते. मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागा पात्रातील श्री नारदमूनी मंदिराचे धार्मिक कार्य ते अनेक वर्षे करीत होते.
येथील वैकुंठ स्मशान भुमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोळी समाजातील बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
——————————————————-

