पंढरपूर – येथील आर्यवैश्य कोमटी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी तथा व्यापारी सुरेश कौलवार यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील गोपाळपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश कौलवार हे गेल्या अनेक वर्षापासून आर्यवैश्य कोमटी समाज, आर्यवैश्य महासभा, पश्चिम महाराष्ट्र आर्यवैश्य, श्रीसंत साधू महाराज सेवा समिती अशा वेगवेगळया संस्था व संघटनेच्या माध्यामातून समाजहिताचे कार्य केले. येथील जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे ते निकटवर्ती मानले जात होते. यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील बाळासाहेब आणि राजाभाउ कौलवार यांचे ते वडील होत.
——————————————————-

