👁 12 Views

दाक्षिणात्य शैलीतील निर्मिती केलेला बहुचर्चित मराठी चित्रपट ‘धुमस’ येत्या 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर झळकणार

पंढरपूर- गरुड फिल्म्स  ची निर्मिती असणारा व दाक्षिणात्य शैलीतील निर्मिती असलेला ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच दि. 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर झळकणार असल्याची माहिती या सिनेमाचे निर्माता व दिग्दर्शक गोवर्धन दोलतांडे व शिवाजी दोलतांडे यांनी दिली. श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर पंढरपूर पत्रकार भवनमध्ये त्यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधुन या चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

‘धुमस’ हा चित्रपट केवळ अडीच महिन्यात पूर्ण केला आहे. सर्व स्टंट सीन स्वतः कलाकारांनी केले आहेत. पूर्ण सिनेमा दाक्षिणात्य स्टाइलने चित्रित करण्यात आला आहे. चित्रीकरण पुणे,शिरूर, लवासा सिटी, पंढरपूर, मंगळवेढा या परिसरात करण्यात आले आहे. यात विशाल निकम,रोहन पाटील, कृतिका गायकवाड, साक्षी चौधरी, पंढरपूर चे प्रा.सुभाष मस्के यांनी भूमिका केल्या आहेत. राजकिय नेते उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिका महत्वपूर्ण आहेत.भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते या मराठीतील  व्यस्त कलाकारांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाचे लेखक अ‍ॅड.अविनाश काले हे आहेत तर कथा-पटकथा सुधीर निकम यांची आहे. श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, सोनू निगम, वैशाली सामंत यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. स्त्रियांनी अन्याय सहन करू नये. असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. हा सिनेमा बिग बजेट असून राज्यात 400 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संगीत दाक्षिणात्य संगीतकार पी. शंकर यांचे आहे. विस्थापितांनी प्रस्थापितांविरुद्ध दिलेला लढा यात आहे. या चित्रपटाची सर्वच गाणी प्रदर्शनाआधीच सुपरहिट ठरली असुन सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या ट्रेलरला भरघोष प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता शीगेला पोहचली आहे.

पत्रकार परिषदेनंतर पंढरीतील सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही सर्व कलाकार व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आदींनी संवाद साधुन चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी धुमस चित्रपटातील गाण्याच्या तालावर कलाकारांसमवेत ठेका धरत उत्तम प्रतिसाद दिला. 

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक – विजयकुमार गायकवाड Whats Up –  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *