पंढरपुर :- जेष्ट ग्रामीण साहित्यिक व संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ.द.ता. भोसले यांना यावर्षीचा कै. आनंदराव फडतरे यांच्या स्मरनार्थ संस्कृती प्रकाशन, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा संस्कृती वाड्मयसेवा पुरस्कार जाहीर झाला असुन महाराष्ट साहित्य परिषदेच्या कै. माधवराव पटवर्धन सभागृहात 17 एप्रिल वार बुधवार या दिवशी सायंकाळी 6.00 वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटिल यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे अशी माहिती संस्कृती प्रकाशन च्या सुनितारजे पवार यांनी दिली आहे.
रोख रक्कम 5000रुपये, मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,श्रिफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ.द.ता. भोसले यांनी आजपर्यंत विपुल प्रमाणात लेखन केले आहे. त्यानी मराठी ग्रामीण साहित्य समृध्द केले आहे. ते मराठी शारदेचे उपासक आहेत. या आधी त्यांना महाराष्ट शासनाच्या पुरस्कारांपासून अनेक मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. ते महाराष्ट्रातील एक महत्वाचे वक्ते व साहित्यिक आहे.
पुरस्कार मिळल्याब्द्दल डॉ.द.ता.भोसले यांचे सर्वच स्थरातुन अभिनंदन होत आहे.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whats Up – 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com