स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात अभिवादन करण्यात आले. समाजसेवक अमोल डोके यांच्या शुभहस्ते क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी समाजसेवक अमोल डोके पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, उपसंपादक विजयकुमार गायकवाड, पत्रकार संतोष कांबळे यांनी महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केले.



