माढा लोकसभा राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा नातेपुते ता. माळशिरस येथे आज शुक्रवारी पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लक्ष्मण जगताप आमच्या सोबत होता.
आमदार झाला पक्ष सोडला नंतर भाजपात गेले. एकदा त्यांचा फोटो आर एस एस च्या पोस्टरवर हाफ पँट, काळी टोपी घातलेला आला जगतापाची ही अवस्था झाली.आता मला ही काळजी आहे की, विजयदादाना हाफ पँट, काळी टोपी घातलेल पहायची वेळ येऊ नये. राष्ट्रवादी सोडली नाही म्हणता, पण कुठल्या ही पक्षात जा , पण हाफ पँट घालू नका. माझी विनंती आहे.विजयदादानी या वयात पाय आणि उघड्या मांड्या बघायची वेळ जनतेवर आणि माझ्यावर आणू नये. अशा शब्दात पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वर घणाघाती टीका केली.

विजयदादाचा साखर धंद्याचा संबध होता का नव्हता..? असे सांगत पवार पुढे म्हणाले , सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी साखर कारखानदारी करताना माझे भाऊ अप्पासाहेब पवार यानी हातभार लावला. मोहितेना मदत केली. जुन्या सहकार्या बद्दल मी वाईट बोलत नाही. मोहिते यांच्या पतसंस्थातेतील लोकांचे पैशे बुडले ते लोक माझ्याकडे आले. पण मी व्यक्तिगत आकस करत नाही. आता मी माळशिरस तालुक्याची जबाबदारी घेतली आहे. असे म्हणत शरद पवार यांनी मोहिते यांना आव्हान दिले आहे.



