👁 10 Views

लोकसभा निवडणुक: तिसर्‍या टप्प्यातील प्रचारास आज पुर्णविराम

लोकसभा निवडणुकीतील तिस-या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सायंकाळी ५ वाजता सांगता होत आहे. तिस-या टप्प्याच्या निवडणुकीत १४ राज्यांतील ११५ मतदारसंघांचा समावेश असून यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघ आहेत. तिस-या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात येत्या मंगळवार, दि. २३ एप्रिलरोजी निवडणूक होत आहे.
या टप्प्यातील निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रक्षा खडसे, गिरीश बापट, सुभाष भामरे, निलेश राणे, सुप्रिया सुळे, संजयमामा शिंदे, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, गुलाबराव देवकर, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, राजू शेट्टी, धनंजय महाडिक आदींचे भवितव्य पणाला लागले आहे.
तिस-या टप्प्यात आसाममध्ये (४ मतदारसंघात), बिहार (५), छत्तीसगड (७), गुजरात (२६), गोवा (२), जम्मू-काश्मीर (१), कर्नाटक (१४), केरळ (२०), महाराष्ट्र (१४), उत्तर प्रदेश (१०), ओडिसा (६), पश्चिम बंगाल (५), दादरा आणि नगर हवेली (१) आणि दीव-दमण (१ मतदारसंघ) या १४ राज्यांत मतदान होईल.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *