👁 9 Views

तरूणाचा डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करुन खून

 

इस्लामपूर ;  वाळवा तालुक्यातील अहिरवाडी येथील सुरज बाळासो सावंत (वय २५ ) या तरुणाचा डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करुन खून करण्यात आला.


 हा प्रकार काल (गुरुवार) रात्री तुजारपूर गावच्या हद्दीत घडला.


खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


सुरज हा गावातच दूध डेअरी चालवित होता. तो अविवाहीत असून, आई व तो दोघेच राहत होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *