या वेळी बोलताना विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबडेकर प्रतिष्ठाणचे संस्थापक नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,डॉ.बाबासाहेब अंाबेडकर जयंती निमित्ताने एकुण 8 मंडळांनी भव्यदिव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते.या मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना प्रतिष्ठाणच्या वतीने पाणी बाटली,बिस्कीट वाटप करण्यात आले तर मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या पदाधिकार्यांना मानाचा फेटा,पंचशील आणि सन्मानपत्र व तसेच रोप भेट देवून सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आदम बागवान,रमेश सासवडकर,पदमाकर सर्वगोड,संतोष बंडगर,आण्णा सलगर,अजिंक्य देवमारे,पद्माकर सर्वगोड,निेलेश जाधव,सचिन जाधव,सुरेश नवले,प्रा.सुदर्शन मसुरे ,सचिन बडकवार,सारिका जाधव,आकाश फडतरे,ऍड.प्रशांत सर्वगोड,आदम मुजावर,सोहन जैस्वाल,लखन मानेयांच्यासह प्रतिष्ठाणच्या विविध पदाधिकर्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


