👁 8 Views

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

 

बारामती: शहरातील तांदूळवाडी भागात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा टाकत 25 हजार रुपयांच्या हातभट्टीच्या दारूसह पाच लाख रुपयांची मोटार जप्त केली तसेच माळेगाव येथेही छापा टाकण्यात आला.


प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात संभाजी रखमाजी माने (रा. कदम बंगल्याशेजारी, तांदूळवाडी, बारामती) व चेतन जाधव, विठ्ठल चव्हाण (दोघे रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वैभव साळवे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुका पोलिसांना सोबत घेत येथील कर्मचार्‍यांनी छापा टाकला. या वेळी संभाजी माने यांच्या घरासमोर सफारी (एमएच 12, डीएस 3420) दिसली. तिच्या बाजूला दोघे उभे होते.


पोलिसांची चाहूल लागताच ते पसार झाले. घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी विकत असलेल्या संभाजी माने याने पळून गेलेल्यांमध्ये चेतन जाधव व विठ्ठल चव्हाण (दोघे रा. माळेगाव बुद्रुक) यांचा समावेश असल्याचे सांगितले. पोलिसांनी या ठिकाणाहून 2500 रुपये किमतीची प्लास्टिक कॅनमधील दारू तसेच पाच लाख रुपयांची गाडी जप्त केली. या पथकाने संभाजी माने याने सांगितल्यानुसार माळेगाव बुद्रुक येथे चेतन जाधव याच्या घरी छापा मारून 35 कँड दारू व अन्य साहित्य जप्त केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *