👁 10 Views

महाशिवरात्र पर्व: दुपारपर्यंत वैद्यनाथचरणी सुमारे 3 लाख भाविक नतमस्तक | अलोट गर्दी.

*हर हर महादेव! प्रभू वैद्यनाथ महाराज की जय! अशा जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमला*

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात आज शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री पर्वानिमित्त मोठी गर्दी झाली आहे. राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी तब्बल  महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह राज्य, परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत.


महाशिवरात्रीच्या पावनदिनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पाचव्या क्रमांकाचे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी परळी नगरात भाविकांची मांदियाळी दिसून आली. लाखो भाविक प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी परळी नगरीत दाखल झाले असून जणू काही परळी नगरीला कुंभमेळा भरले असल्याचे स्वरूप आले आहे. हर हर महादेव! प्रभू वैजनाथ महाराज की जय! अशा जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दणाणून गेला. प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी परळी शहर व तालुक्यातील नागरिकांसह देशभरातून शिवभक्तांची रीघ लागली होती पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या प्रभवती नाथा चे दर्शन नागरिकांना सुलभ घेता यावे यासाठी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने ब्यारीकेटिंग करून चोख नियोजन करण्यात आले होते.


महाशिवरात्रीच्या दिनी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी रिघ लावली आहे. राज्यासह सीमावर्ती भागातील शेकडो भाविक  परळी शहरात दाखल झाले होते. 


परळी नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरिता शहरातील अनेक सामाजिक संघटना यांनी उपवासाच्या फराळाची, पिण्याच्या पाण्याची जागोजागी मोफत सोय उपलब्ध केली आहे. वैद्यनाथ मंदिर कमिटीचे ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह सर्व सदस्य मंदिर परिसरात देखरेख, नियोजन व खबरदारी घेण्यासाठी उपस्थित आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *