
पंढरपूर च्या विकासात येथील पत्रकारांनी अतिशय जबाबदारीने आपली भुमिका मांडुन मोलाचे योगदान दिले आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, माहीती अधिकारी पवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय तेली यांनी आजच्या पत्रकारीतेतील वास्तवता आणि संंघर्ष याचे विवेचन करुन प्रसंगी अतिशय समर प्रसंगाना तोंड देत प्रकारांना आपली लेखनी चालवावी लागते,जनगागृतीसाठी परिश्रम घ्यावे लागतात असे सांगीतले. आद्य पत्रकार व दर्पण या या पहिल्या वृत्तपत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी प्रास्ताविक करताना पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी गेल्या वर्षभरात संघाने केलेल्या कामागिरीचा आढावा घेत पत्रकारांच्या सुविधेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे लवकरच पत्रकार कक्ष उपलब्ध होत असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमास पंढरपूर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी,सदस्य तसेच श्रमिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार लोकमंगल उद्योग समुहाचे वतीने हार व दिनदर्शिका देऊन करण्यात आला. तसेच यावेळी पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते व विश्वभुषण डॉ. डि. राज सर्वगोड यांचे वतीने सर्व पत्रकारांना आकर्षक भेटकार्ड देण्यात आले. यावेळी डि.राज सर्वगोड व त्यांचे सहकारी मित्र श्री.ननवरे हे उपस्थित होते.