मंगळवेढा : प्रतिनिधी:-पत्रकारिता ही सर्वसामान्यासाठी कॉमन मॅन बनली असून समाजातील तळागाळातील विविध प्रश्न मांडून आपल्या लिखणी द्वारे सर्वसामान्यांना न्याय देतो व दिवस व रात्र जिवाची परवा न करता तो समाजासाठी काम करत असतो अशा पत्रकारासाठी एका ठिकाणी राहण्याची सोय व्हावी यासाठी ग्रहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे मत प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी पत्रकार दीना निमित्त व्यक्त केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणदीना निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली.
मंगळवेढा पत्रकार सेवा संघाच्या वतीने नगरवाचनालय येथे पत्रकार
दिना निमित्त प्रांताधिकारी बोलताना, यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे,
तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, पोलिस निरीक्षक
सुधाकर देडे आदि.(छाया –विठ्ठल ढगे.मंगळवेढा)
यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार गंगाप्रसाद कांबळे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना म्हणाले की ,पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्याच्या शिवाय समाज चालत नाही, त्यामुळे दिवसभरातील विविध घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पत्रकार देत असतो , बातमी ही प्रत्येक कुटुंबाची अविभाज्यक घटक बनली आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर नावीन्य पूर्ण अभ्यास करून विविध प्रश्न मांडले पाहिजेत तरच व्यक्तीचा, समाजाचा,गावचा व तालुक्याचा विकास होत आहे.
मंगळवेढा तालुका पत्रकार सेवा संघाची नुतून कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली – अध्यक्षपदी औदुंबर ढावरे तर उपाध्यक्ष –महेश पाटील,हुकूम मुलाणी , कार्याध्यक्ष- विलास मासाळ,सचिव –समाधान फुगारे,खजिनदार-अजित सावंत,सहसचिव-अहमद शेख,प्रसिध्दी प्रमुख-साधू गरांडे व विठ्ठल ढगे,संघटक
–रामभाऊ दोलतडे तर सल्लागार पदी म्हणून समीर इनामदार,गुरुदेव स्वामी, ज्ञानेश्वर कुलकर्णी,गंगाप्रसाद कांबळे,योगेश कुलकर्णी तर सदस्य म्हणून बिर्राप्पा करे,प्रवीण पाटील,दत्तात्रय सपताळे,शंकर सपताळे,हिम्मत घाडगे,संजय जाधव,प्रताप परीट,नागेश मासाळ,भारत गवळी,चंद्रकांत चौगुले,स्वप्नील
यादव,संतोष धायगौंडे,सुरेश माळी आदींची निवड करण्यात आली.यावेळी बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे,संजय जाधव,कवि शिवाजी सातपुते,बाळासाहेब घोडके,नामदेव पांढरे,ज्ञानेश्वर हाके,विशाल सावंत,मंगेश भडंगे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी शेखर
शेलार, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार गंगाप्रसाद कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिराप्पा करे तर आभार संस्थापक अध्यक्ष विलास मासाळ यांनी मानले.