
मुंबई पोलिसांनी ‘असहिष्णुते’वर भाष्य करणारा अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली होती. केवळ, आमिर आणि शाहरुखच नाही तर जवळपास २५ बॉलिवूड हस्तींच्या सुरक्षेत घट करण्यात आल्याचं वृत्त होतं. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या वादावर मुंबई पोलिसांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.