👁 7 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये छञपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये १९ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली छञपती शिवाजी महाराज यांच्या


 पुतळ्याचे पुजन उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सुमित इंगोले, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी नागेंद्र नायकुडे सह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.


    यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ व्या जयंतीचे औचित्य साधून पालवी या ठिकाणी एड्सग्रस्त बालक यांच्या संगोपनासाठी सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून पालवी संस्थेत जाऊन विद्यार्थ्यांना अन्नधान्य देऊन त्यांच्याशी संवाद साधला. याशिवाय सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनासंदर्भात माहिती घेऊन पालवीच्या विद्यार्थ्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.


   याशिवाय सिंहगड कॉलेज प्रत्येक वर्षी शिवजयंती निमित्त पालवी संस्थेतला विविध प्रकारे मदत करत असते यावर्षी हि विद्यार्थ्यांसाठी लागणारा पोषण आहार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.


    हा कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधिल सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *