-
-
नागपूर : मुलीसोबत बोलण्यावरून उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे कामठीत काही काळ तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर चार साथीदार पसार झाले आहेत.शेख दानिश शेख अन्वर (२०) असे मृताचे नाव असून त्याचा लहान भाऊ शेख राजिक शेख अन्वर (१६) आणि त्याचा मित्र आकाश राऊत (२१) हे जखमी झाले. दानिश हा सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होता. राजिक (११ वी) आणि मित्र आकाश यांच्यासह तो सकाळी ११.३०च्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मैत्रिणीसोबत बोलत होता. त्याचवेळी बारावीत शिकणारा अमन यादव (१८) तेथे आला. त्याने ‘तिच्याशी का बोलतो,’ अशी दानिशला विचारणा केली. त्यामुळे वाद उद्भवून दानिश आणि त्याचा भाऊ राजिक या दोघांनी अमनला मारहाण केली. यानंतर अमन तेथून निघून गेला. चार साथीदारांना घेऊन अमन उभा राहिला. तेथे राजिक आला असता त्याला मारहाण केली.
-
Posted inPandharpur Live News
