नवी दिल्ली : बीबीसीआयनं टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी भारताच्या टीमची घोषणा केलीय. या खेळाडुंमध्ये तेजतर्रार बॉलर मोहम्मद शमीच्या नावाचाही समावेश आहे… पण, ही निवड मात्र वादात अडकलीय.
बंगाल क्रिकेट संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शामी सध्या खेळण्यासाठी फीट नाही. शमीला फिट होण्यासाठी काही आणखीन काही काळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मात्र, याउलट निवडसमितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मात्र मोहम्मद शमी फीट आहे आणि तो चांगलं खेळत असल्याचं म्हटलंय.
