पंढरपूर : पंढरपूर : येथील श्रमिक पत्रकार संघाची सन 2016 – 17 या वर्षाकरीताची कार्यकारणी संघाचे अध्यक्ष महेश भंडारकवठेकर यांनी जाहीर केली. यामध्ये दोन उपाध्यक्ष, सचिव, कार्माध्यक्ष, कोषाध्यक्ष प्रसिध्दीप्रमुख यांच्यासह सात कार्यकारणी सदस्य तर पाच कायम निमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान संघाचे नुतन अध्यक्ष महेश भंडारकवठेकर यांची निवड 29 जानेवारी रोजी सर्वानुमते करण्यात आली होती. अध्यक्षांच्मा मार्गदर्शनाखाली सदर कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.
नुतन पदाधिकार्यांमध्ये उपाध्यक्षपदी दत्तात्रय खटवटे, सचिन कसबे, सचिवपदी संजय वाईकर, कार्याध्यक्षपदी अभय जोशी, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश चांडोले तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून श्माम दिवेकर यांची निवड झाली आहे.
मा संघात कायम निमंत्रीत सदस्य म्हणून संघाचे माजी अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, सुनिल उंबरे, अतुल बडवे व नवनाथ पोरे यांना स्थान देण्यात आले आहे.
कार्यकारणी सदस्यांमध्ये सिध्दार्थ ढवळे, प्रशांत आराध्ये, शिवाजी शिंदे, सुनिल दिवाण, विनामक हरिदास, सचिन झाडे व भारत नागणे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी श्रमिक संघटनेचे आजी माजी पदाधिाकारी व सभासद उपस्थित होते.


