जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्वाची – मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल जोशी

                                                                    
पंढरपूर दि. 11:- 
बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतुन प्रसारित होणा-या जंतामुळे निर्माण होत असुन, कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असल्याने बालकांची बौद्धिक व शारिरीक वाढ खुंटते,  त्यामुळे सर्वांनी मुलांची वैयक्तिक व परिसराची स्वच्छता राखणे महत्वाची असल्याचे न.पाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल जोशी यांनी सांगितले.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिम अंमलबजावणी कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालय येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोफत औषधाचे वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा साधना भोसले, नगरपरिषद शिक्षण समिती सभापती शैलेश बडवे, महिला व बालकल्याण सभापती अनिता सर्वगोड, आरोग्य विभागाच्या सभापती मनिषा कोताळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बजरंग धोत्रे आदी उपस्थित होते.
शहरातील शाळा व अंगणवाडी केंद्रावरील 6 ते 19 या वयोगटातील सर्व मुले व मुलींना  जंतनाशक गोळी देऊन त्यांची पोषण स्थिती व आरोग्य चांगले ठेवणे तसेच  शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश असल्याचेही डॉ. अनिल जोशी यांनी  यावेळी सांगितले.
 या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा सौ.साधना भोसले यांच्या हस्ते शाळा व अंगणवाडीतील उपस्थित  मुला-मुलींना जंतनाशक औषधाचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमास डॉ. संभाजी भोसले, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. सालविठ्ठल, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सदानंद डिंगरे यांच्यासह  शिक्षक व आरोग्य कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *