जम्मू-काश्मीरजवळच्या कुपवाडा जिल्ह्यात नाशिकचा वीर शहीद….वीजापूरच्या जवानालाही वीरमरण

उधमपूर (जम्मू काश्मीर) :

 जम्मू-काश्मीरजवळच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत नाशिकच्या वीरासह दोन जवान शहीद झाले आहेत. अतिरेक्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं. नायक शंकर चंद्रभान शिंदे आणि सहदेव मारुती मोरे अशी या वीरांची नावं आहेत.
   शंकर शिंदे हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या बायले गावचे रहिवाशी, तर सहदेव मोरे हे कर्नाटकातील विजापूरचे आहेत.
     शंकर शिंदे यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगी (वय 6 वर्ष 5 महिने) मुलगा (वय 1 वर्ष 8 महिने) असं कुटुंब आहे. तर सहदेव मारुती मोरे यांच्या पश्चात त्यांची आई रखमाबाई आहे.
   अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत एक मेजर दर्जाचा अधिकारी जखमीही झाला आहे.
      झुनरेशी गावात चार अतिरेकी घुसल्याची बातमी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी झुनरेशी गावात सर्च ऑपरेशन सुरु केलं. यावेळी अतिरेक्यांसोबत धुमश्चक्री सुरु झाली. यादरम्यान नायक शंकर शिंदे आणि सहदेव मोरे विजापूरयांना गोळी लागल्याने ते धारातीर्थी पडले.
    अजूनही या अतिरेक्यांशी धुमश्चक्री सुरु  असून, 5  अतिरेक्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *