पंढरपूर (प्रतिनिधी):- नागालॅन्ड चौक शिवजन्मोत्सव मंडळाने प्रथमच या वर्षी शिवजयंती उत्सवाचा आरंभ केला. सिंहासनाधिष्ठ शिवरायांच्या पुतळ्यास खर्डी चे उपसरपंच प्रणव परिचारक यांचे शुभह्स्ते पुष्पहार अर्पण करुन शिवरायांचे पुजन केले.
तसेच संभाजी ब्रिगेड चे पंढरपूर शहराध्यक्ष स्वागत कदम, माजी नगरसेवक किरण घाडगे व सर्व कार्यकर्त्यांनी येथे भेट देऊन शिवछत्रपतींना मानवंदना अर्पण केली.
पुणे येथील शिवतंत्र या पुस्तकाचे लेखक दत्ताभाऊ सोनवणे यांचेसह छावा युवक संघटनेचे शहर प्रमुख सागर कदम यांनीही शिवपुजन केले. यावेळी मंडळास आवर्जुन भेट दिलेले शिवतंत्रकार शिवलेखक दत्ताभाऊ सोनवणे यांचा सत्कार खादी ग्रामोद्योग चे संचालक गणेश सिंघण यांनी केला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे, उपाध्यक्ष भगवान वानखेडे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रणव परिचारक म्हणाले की, शिवरायांच्या विचारांचे पाईक असलेले तरुण निर्माण व्हावेत. छत्रपतींच्या विचारानेच आपले भवितव्य उज्वल करता येणे शक्य आहे. छत्रपतींच्या विचारांची कास धरल्यास जीवनात कोणत्याही गोष्टीत आपण सक्सेस बनु शकाल. कठीण काळात शिवरायांचे विचारच आपणास तारु शकतात.
यावेळी प्रा.नागेश सिंघण, शंकरअण्णा ऐतवाडकर, खादी ग्रामोद्योगचे संचालक गणेश सिंघण, भगवान वानखेडे, नारायण सिंघण, सिध्देश्वर सिंघण, शाम सिंघण, राम सिंघण, प्रणव कुलकर्णी, पिंटु बंदपट्टे, नवनाथ रानगट, संग्रामसिंह भालके, शितल होरणे, आशिष देशमाने, पिंटू साळुंखे, प्रतापसिंह देवकर, सचिन ताम्हाने, सुनिल वरपे, भीमा काथवटे, तुकाराम राऊत आदी उपस्थित होते.

