
व्यायामाच्या अनेक प्रकारांपैकी सगळ्यात सोपा, विनाखर्चाचा आणि उपयुक्त प्रकार म्हणजे तासभर चालणे.अर्थात यालाही प्रचंड इच्छाशक्ती लागते.आळस कंटाळा असणाऱ्यांना हे हि अशक्यप्राय वाटत असते.म्हणून प्रचंड इच्छाशक्ती म्हणायचे.हल्ली रस्त्यावर,गार्डन्स मधून सकाळी व सायंकाळी लोकांची चांगली गर्दी पाहायला मिळते.त्यापैकी काहीजण डॉक्टरने सांगितले आहे म्हणून,तर काही जण वजन कमी व्हावे म्हणून तर काही जण एकमेकांना सोबत म्हणूनही ( शेजारची अथवा शेजारचा जायला निघाला म्हणून ) वाकिंग ला जात असतात.फारच मोजके असे असतात जे आवडीने मनापासून चालायला जातात.यांचा प्रयत्न असतो कि वर्षाचे १२ महिने ३६५ दिवस न चुकता चालायला जावे.इतराना मात्र आजच्या नंतर उद्या आपण येऊ कि नाही हेही माहित नसते.वाकिंगणे भरपूर फायदे होतात पण ते नियमित असेल तर.नाही तर काही विशेष फरक न दिसल्याने वाकिंगवरची इच्छा आणि विश्वासच उडून जातो.
थोडक्यात सांगायचे म्हणजे समोर एखादे उद्दीष्ट ठेऊन व्यायाम करणे तितकेसे बरोबर नाही.कारण आपल्याला हवी असलेली शाररिक प्रगती हि आपला आहार,दिनचर्या,पुरेशी विश्रांती,अनुवंशिकता औषधोपचार या सर्वांवर अवलंबून असते.वॉकिंग कशी केली पाहिजे हे समजून घऊन मगच सुरवात करावी.हा काही साधासुधा व्यायाम प्रकार नव्हे.अहो रक्तदाबाची समस्या कमी करणारा,सर्व सांध्यांमधून ल्युब्रिकेशन वाढवणारा,सांधेदुखीचा त्रास कमी करणारा,वजन घटवणारा,पोटाचा व कंबरेचा घेर कमी करणारा, मांड्या व हिप्स घटवणारा, मधुमेह, थायरॉईडची समस्या कमी करणारा,पचन सुधरावणारा, दम्यासारख्या रोगाला लगाम घालणारा प्रकार आहे हा.एवढे फायदे दुसरे कोण देणार आहे मला सांगा, ते हि फुकटमध्ये.कारण चालायला पैसे नाही लागत.फक्त मनाची तयारी आणि आपले आपल्या शरीरावर प्रेम असावे लागते.जिथे लाखो रुपये खर्च करून ,संपूर्ण आयुष्य औषधे गोळ्या खाऊन म्हणावे तसे आरोग्य मिळत नाही तिथे फक्त चालून ते मिळत असेल तर काय हरकत आहे वाकिंगशी गट्टी करायला.
पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या.एवढे फायदे मिळवायचे असतील तर वाकिंग सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे.सर्वसाधारण लोक करतात तसे नव्हे.हे यासाठी लिहावे लागते कारण एखाद्या दिवशी आपण शांतपणे उभे राहून बघा लोक कसे चालतात.आपल्याला पाहायला मिळतील असे लोक जे ३-४ लोकांचा ग्रुप करून गप्पा मारत अक्षरशा एकमेकांना टाळ्या देत हसत खेळत वाक घेत असतात.स्त्रिया तर घरातील बाहेरील आपल्या परिवारजनाच्या, शेजारणीचा,ऑफसमधला कुठलातरी विषय घेऊन कधी हसत तर कधी रागवत चालत असतात.बऱ्याचदा पतिपत्नी एकत्रपणे चालत भविष्याचे प्रश्न सोडवत असतात तर कधी एखादा तरुण अथवा तरुणी कानात इअरफोन्स कोंबून आपले कुणीच नासल्याप्रमाने चालत असतात.काहीजण अथवा काहीजणी तर चक्क चालणे थांबऊन घोळका करून गप्पांचा फड रांगवतात.आणि सगळ्यात शेवटी “चला उद्या भेट”असे म्हणत दुसऱ्या दिवसाचे आमंत्रण देऊन मगच घरचा मार्ग धरतात.मला काळत नाही काय चालले आहे हे ?
अहो दिवसभराचा एक महत्वाचा तास चकाट्या फुकण्यात वाया घालवला.असे म्हटले कि लोक म्हणतात आम्ही बोलत का होईना चाललो ना ?. अरे आसल्या चालण्याला काय अर्थ आहे.शरीरावर उपकार केल्याप्रमाणे चालू नका हो.देवाची पूजा आपण कशी एकट्यानेच मन लाऊन करतो मग ज्या शरीरात ईश्वर वास करतो त्या शरीराला तंदुरुस्त राखण्यासाठी मन लावूनच वाकिंग किंवा इतर व्यायाम केले पाहिजेत.मग आता प्रश्न पडतो चालायचे तरी कसे ? आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल .याचे शास्त्रीय उत्तर आपण उद्याच्या लेखात पाहू.
वाचक मायबाप हो आम्ही जे सदर आपल्या आरोग्यासाठी सुरु केले आहे यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळायला मिळाल्या तर फार आंनद होईल.आणि आरोग्याबाबत आपल्या काही शंका असतील तर संपर्क करा.आपले समाधान करणे माझे कर्तव्य समजतो.तर भेटूया उद्याच्या लेखात.माझा नंबर लक्षात असू द्या ९६१९३२४०८०.माझ्या अधिक माहिती साठी भेट द्या www.dattagaikwad.com


