वाकिंगला जाण्यापूर्वी मनाची तयारी करा.प्रथम रात्री झोप पूर्ण झाली आहे का हे लक्षात घेऊन मगच ठरवायचे आज किती वेळ चालायचे आहे, कारण झोप पूर्ण झाली नसेल तर शरीर थकलेल्या अवस्थेत असते.या दिवशी तासभर चालण्याचा हट्ट न करता अर्धातास अथवा चाळीस एक मिनिटेच चालण्याचे ठरवावे.तब्बेत बरी नसेल तर वॉक टाळावा. चालताना अंगात साधारण सैल कपडे असावेत .पण ते शोभतील असे असावेत व चालण्यात अडचण निर्माण करणारे नसावेत. दुसऱ्याचे मन विचलित होईल असे तर बिलकुल असू नयेत. बऱ्याच स्त्रिया कपडे बद्दलण्याचा आळस करतात आणि रात्रीच्याच कपड्यावर म्हणजे गाऊन अथवा मेक्सिवरच चालायला जात असतात.हे काही बरोबर वाटत नाही.पायात रोज वापरातल्या चपला चुकूनही घालू नयेत.कारण नेहमीच्या वापरातील चपला एका बाजूने घासलेल्या असतात.यामुळे अँकल, गुडघे, व कंबरेचा त्रास सुरु होऊ शकतो.म्हणून स्पोर्ट शूज घालायला आळस करू नये.शूज मूळे पावलांना चांगला आधार मिळतो व होणारा त्रास आपोआप टळला जातो.
म्हणजे आपल्या लक्षात आले असेल कि प्रथम मनाची तयारी,ठराविक कपडे, व स्पोर्ट शूज आणि अतिशय महत्वाचे म्हणजे साधारण लिटरभर पाण्याची बाटली आणि हातात घड्याळ ,एवढेच लागत वॉकिंग करण्यासाठी.मोबाईल फोन सोबत न्यायचा गरजेचे असल्यास तो सायलेन्टवर ठेवावा.कारण चुकून एखादा फोन आपल्याला त्रास होणारा, राग आणणारा असू शकतो,वार्तालाप करत चालताना आपला रक्तदाब वाढून मोठा अपघात होऊ शकतो, केवळ यासाठीच मी फोनच्या विरोधात असतो.(व्यायाम करताना ) एअरफोन्स तर चुकूनही सोबत घेऊ नयेत.अनेक लोक चालताना बोअर व्हायला होते म्हणून संगीत ऐकत चालताना दिसतात.हे आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य नाही.चालताना बऱ्याच गोष्टींवर लक्ष द्यावे लागते संगीत ऐकत ते शक्य होत नाही.वॉक सुरु करण्यापूर्वी डॉक्टर कढून पल्सरेट कशी चेक करावी हे शिकून घ्यावी म्हणजे चालताना हार्टरेट (पल्सरेट ) किती मेन्टेन करायचा हे समजते. एवढी खबरदारी आपण घेतली कि मग साइन्टिफिक वॉक काय आहे हे समजायला सोपे जाते.
आता नीट लक्ष्य द्या, चालताना अनेकांचे पावले किंचित वाकडी पडतात.प्रयत्न करावा कि ती नीट पडावीत.पाठीचा कणा ताठ ठेवावा.खांदे किंचित मागे करून ठेवावेत म्हणजे छाती प्रसरण पावलेल्या अवस्थेत राहते,यामुळे फुफ्फुसे प्रसरण पाऊन जास्त प्राणवायू घेऊ लागतात.बऱ्याच महिलांना मान एकबाजूला मोडून चालायची सवय असते (नकळत ) ती आधी सरळ करावी.अन्यथा मानेचा आजार सुरु झालाच म्हणायचा.नेहमी पेक्षा थोडे वेगाने चालण्याचा सराव ठेवावा.चालताना पायातील अंतर थोडे जास्तच असावे ,असे केल्याने मांड्या व नितंबाना तसेच पाठीला चांगला व्यायाम मिळतो.चालताना उगाचच हात जास्त हलवू नयेत.
आता सर्वात महत्वाचे म्हणजे श्वासोश्वास कसा करावा ?
कार्डिओ ट्रेनिंग म्हणजेच हृदयासंबंधीत व्यायाम प्रकार, एकाचवेळी हृदय,रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणारा हा अत्यंत उत्तम व्यायाम प्रकार.मग श्वासाला किती महत्व आहे हे सांगायची गरज नाही.वॉक करताना समांतर श्वसन जर झाले तर शरीराला प्राणवायु मोठ्याप्रमाणात मिळतो अथवा लवकर थकवा येऊ लागतो।.मग समांतर श्वसन म्हणजे काय आणि ते कसे करायचे हे आपण पाहू उद्याच्या लेखा मध्ये.शंकानिरसन आणि आपल्या विभागातून आरोग्य शिबिरासाठी आजच संपर्क करा ९६१९३२४०८०.
भेट दया-www.dattagaikwad.com

