त्रैमासिक विवरणपत्राबाबत आवाहन पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत आवाहन… डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराबाबत आवाहन…
त्रैमासिक विवरणपत्राबाबत आवाहन
सोलापूर दि. 22 : सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील नियोक्त्यांनी त्रैमासिक विवरणपत्र ई आर-1 https ://www.maharoigar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरुन सादर करावीत. ही विवरणपत्रे दिनांक 30 एप्रिल 2016 पूर्वी सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पद्मशाली भवन, रविवार पेठ, कन्ना चौक, सोलापूर या कार्यालयाकडे सादर करावीत. असे आवाहन सहायक संचालकांनी यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
0 0 0 0
पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत आवाहन
सोलापूर दि.22 :- सन 2016-17 या वर्षातील खरीप हंगामाकरीता पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून या योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 तर नगदी पिकासाठी 5 टक्के इतका विमा हप्त्याचा दर शेतक-यांनी भरावयाचा असून या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित शेतक-यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडे अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधावा. सन 2016-17 या वर्षातील पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी 31 जुलै तर रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर 2016 अखेरपर्यत मुदत आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित शेतक-यांनी त्या-त्या तालुकाच्या कृषी अधिका-याशी अथवा उप विभागीय कृषी अधिका-याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
0 0 0 0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराबाबत आवाहन
सोलापूर दि.22 – अनुसूचीत जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जातीच्या कल्याणार्थ कार्य, शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल, वृध्द, अपंग, कुष्ठरोगी यांच्या उत्थानासाठी झटणा-या समाजसेवकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून याच वर्षाकरीता डॉ.बाबासाहे आंबेडकर समाजउत्थान पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित अर्जदारांनी आपला प्रस्ताव 2 प्रतीत दिनांक 28 एप्रिल 2016 पर्यंत सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर (दूरध्वनी 0217-2734950) या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
0 0 0 0
