औज, चिंचपूर बंधा-यावरील बेकायदेशीर पाणी उपसा करण्यास मनाई

        
  
 सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज,
चिंचपूर येथील भीमा नदीवरील      
बंधा-यावरील   शेतक-यांचे अनाधिकृत
इलेक्ट्रीक व डिझेल पंपाद्वारे पाणी उपसा होत आहे त्यामूळे बंधा-यातील पाणी पातळी
झपाट्याने उतरत आहे. याबाबत रघुनाथ पोटे कार्यकारी दंडाधिकारी  द. सोलापूर यांनी फौजदारी संहिता कायदा 1973 चे
कलम 144 कलमाद्वारे मनाई आदेश जारी केले आहेत.
     सोलापूर
महानगरपालिकेस पाणी पुरवठा करण्यासाठी औज व चिंचपूर बंधारा वापरला जातो. औज
बंधा-याची उंची 4.5 मि. व चिंचपूर बंधा-याची उंची 4.5 असून दि. 20 एप्रिल 2016
रोजी ही बंधारे पाटबंधारे विभागाकडून उजनी जलाशयातील पाण्यामूळे भरुन घेतले आहेत.
औज बंधा-याची सद्याची पाण्याची पातळी 3.60 मि. व चिंचपूर बंधा-यातील पाण्याची
पातळी 3.50 मि इतके आहे.
     सदरचे पाणी सोलापूर शहरास 2 महिने पुरवायचे आहे तथापि बंधा-याच्या
अलिकडे व पलिकडे दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या इलेक्ट्रीक मोटारी
रात्रंदिवस चालू असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामूळे
बंधा-यातील पाण्याची पातळी झपाट्याने उतरत आहे. त्यामूळे सोलापूर शहरात होणारा
पाणीपुरवठा महिना अखेर पर्यंतच पुरेल यासाठी दि. 12 मे 2016 ते 31 मे 2016 रोजी
पर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत ( वीस दिवस) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम
144 लागू करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यानुसार सदर आदेश लागू
करण्यात आला आहे.
     या कलमाच्या अनुषंगाने औज व चिंचपूर बंधा-यावर बेकायदेशीर
इलेक्ट्रीक मोटार व डिझेल पंपाद्वारे पाणी उपसा करणे, अनाधिकृत परवानगीपेक्षा
जास्त एच.पी. मोटार वापरणे, इर्न्हटर लावून पाणी उपसा
करणे, अनाधिकृत वीज कनेकशन घेणे आदी 
कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे
.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *