सांगोला चौकात 80 वर्षाच्या वृध्दाला एसटीची धडक

पंढरपूर (प्रतिनिधी)-पंढरीतील सांगोला चौकात एसटी बसने धडक देऊन ङ्गरङ्गटत नेल्याने मंगळवेढा तालुक्यातील एक वयोवृध्द जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर येथील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये उपचार चालु आहेत.

याबाबात पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून समजलेले वृत्त असे की, बाजीराव बंडू लंगडे (वय-80), रा. ढवळस, ता. मंगळवेढा हे जेष्ठ नागरिक पंढरीतील सांगोला चौक येथे दि. 17 मे 2016 रोजी दुपारी दोन वाजणेच्या सुमारास थांबलेले असताना एसटी बस क्र. एमएच- 40 वाय. 5036 या बसचा चालक बाळु महादेव खटके, रा. आसबेवाडी, ता. मंगळवेढा याने भरधाव वेगाने एसटी चालवुन लंगडे यांना धडक देऊन ङ्गरङ्गटत नेल्यामुळे त्यांच्या पायाच्या घोट्याजवळचे हाड मोडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. अशी ङ्गिर्याद स्वत: बाजीराव लंगडे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांचेवर जनकल्याण हॉस्पिटल येथे उपचार चालु आहेत.

या घटनेचा अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे एएसआय जावीर हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *