👁 2 Views

पंढरीच्या मंथन मुडके याचे नेत्रदिपक यश

पंढरपूर (प्रतिनिधी):- इयत्ता 10 वी च्या परीक्षेत येथील द. ह. कवठेकर चा विद्यार्थी चि. मंथन बाळासाहेब मुडके याने सर्वच विषयात लक्षवेधी गुण मिळवून एकुण 90.80% गुणांकाने नेत्रदिपक अशी कामगिरी केली आहे. मंथनला दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने पंढरपूर कार्यालयात नुकत्याच शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गुरुबसाप्पा यांचे चिरंजीव बाळासाहेब मुडके व सौ.राजश्री मुडके यांचा सुपूत्र मंथन याचे सर्व प्राथमीक शिक्षण आदर्श विद्यालय, पंढरपूर येथे  तर माध्यमीक शिक्षण द.ह.कवठेकर प्रशालेत झाले. सुरुवातीपासूनच सायन्स या विषयात मला रुची होती. सायन्स मध्ये एकुण 93 मार्क मिळाले आहेत. मात्र ते माझ्या अपेक्षेेपेक्षा कमीच आहेत. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक यारगट्टीकर सर व वर्गशिक्षक आर.एस. कुलकर्णी सर तसेच इतर शिक्षक व टॉपर्स अ‍ॅकॅडमीचे गणेश धांडोरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. आई-बाबांचे स्वप्न साकारण्यासाठी यापुढील काळात अधिक खडतर परिश्रम घेऊन मोठे यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहीन असा विश्‍वास मंथनने व्यक्त केला.

मंथनने सायन्स-93, मराठी-91, गणित-91, इंग्रजी-81, सोशल सायनस-82 व संस्कृतमध्ये 97 गुण मिळविले आहेत. मंथनला एकुण 90.80% गुण मिळाले आहेत.

मंथनला त्याच्या यशाबद्दल दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या पंढरपूर विभागीय कार्यालयात विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंथनचे वडील बाळासाहेब मुडके (तलाठी, विरवडे (बु.), ता.मोहोळ), रङ्गिक आतार व महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *