पंढरपूर (प्रतिनिधी):- शहरात 4 मुख्य वार्या भरत असल्याकारणाने या ठिकाणी वाहतुकीची समस्या भेडसावते यावर उपाय म्हणून वाहतुक नियमनात प्रायोगिक तत्वावर दिनांक 14 जुलै 2016 पर्यंत बदल करण्यात आला असून, या बदलाची नागरीकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक निलेश गोपाळचावडीकर हे स्वत: शहरातील वाहतुक सुरळीत करणेसाठी प्रयत्नशील आहेत.
पंढरपूर शहरातील वाहतुक बदलाची ठिकाणे पुढील प्रमाणे- (1) (पार्किगसाठी) घनश्याम हौसिंग सोसायटी शेजारी, जुन्या एस.टी.स्टॅण्ड समोर, शिवाजी चौक ते खादी ग्रामाद्योग जागा, क्रिडा संकुल, अंबाबाई पटागंण, आपटे प्रशाला, सहकार चौक, कवठेकर गल्ली, सोलापूर रोडवरील शेगांव दुमाला व भंटूबरे या ठिकाणी वाहने पार्किग करावीत. (2) सम-विषम पार्किंग शिवाजी चौक ते अर्बन बँक, भोसले चौक ते गोल्डन टी स्टेशन रोड पर्यंत , भोसले चौक ते कैकाडी महाराज चौक व जिजामाता उद्याना समोरफक्त दुचाकी वाहने पार्किंग करावित. (3) नो-पार्किंग भादुले चौक ते नाथ चौक, शिवाजी चौक ते चौफाळा, शिवाजी चौक ते भगवा चौक, चौफाळा ते मंदीराच्या दोन्ही बाजूसह महाव्दार घाटापर्यंत, तहसिल व पंचायत समिती कार्यालयासमोर, सावरकर चौक ते इंदीरा गांधी चौक, तीन – चार चाकी वाहनासांठी तसेच वारी कालावधीत सर्व वाहनासांठी प्रदक्षिणा मार्गावर पार्किंगला बंदी आहे.(4) ना फेरीवाला क्षेत्र- प्रदक्षिणा रस्ता,इंदिरा गांधी चौक ते भोसले चौक, सावरकर चौक ते इंदीरा गांधी चौक, शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक, अर्बन बॅक ते कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज व दर मंगळवार वगळून अर्बन बँक प्रशासकीय इमारत ते शिवाजी चौक (5) फेरीवाला क्षेत्र- स्टेशन रोड ते स्टेट बँक, भोसले चौक , स्टेशन रोड ते महाराजा गोल्ड वरुन महावीरनगर पर्यंत, स्टेशन रोड ते हॉटेल शामियाना वरुन महावीरनगर पर्यंत, मुरारजी कानजी धर्मशाळेच्या पुर्वेचा रस्ता, जाधव जेठाभाई धर्मशाळेच्या पुर्वेचा रस्ता , प्रभू लॉजच्या पश्चिम बाजूचा रस्ता.(6) एकेरी मार्ग-कॉलेज क्रॉस चौक ते वाखरी कडे जाण-या वाहनांनी आपल्या डाव्या बाजूचा तर वाखरी कडून पंढरपूर कडे येणा-या वाहनांनी आपल्या डाव्या बाजूच्या रस्त्याचा वापर करावा. हा आदेश 14 जुलै 2016 पर्यंत राहील असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

